शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सर्वसामान्यांसाठी ३,६६४ घरे , केंद्र शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 3:02 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे योजनेची सुरुवात होणार आहे. चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्यात येणार आहेत.देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत घर नसणाºयांना घर दिले जाणार आहे. नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून किती जणांना घरे हवी आहेत, हे निश्चित केले जाणार आहे.याबाबत स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडी येथे पहिल्या टप्प्यात एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्याच्या डीपीआरला १० नोव्हेंबरला मंजुरी दिली. त्यानंतर हा डीपीआर केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला होता.केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने अवघ्या १९ दिवसांत महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तीन प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्याबाबत केंद्राच्या संबंधित तांत्रिक समितीने बुधवारी महापालिकेला कळविले आहे.’’शहरात १० ठिकाणे प्रस्तावितमहापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चºहोली येथे १४४२ (खर्च १५० कोटी ३२ लाख), रावेतमध्ये ९३४ (खर्च ९१ कोटी ६ लाख), डुडुळगावमध्ये ८९६, दिघीत ८४०, मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये १२८८ ( खर्च १३५ कोटी ९० लाख), वडमुखवाडीत १४००, चिखलीमध्ये १४००, पिंपरीत ३००, पिंपरीतच आणखी २०० आणि आकुर्डीमध्ये ५०० घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. योजनेचा डीपीआर करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHomeघर