पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक सुमारे चार कोटी ३६ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.रावेत मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक १८ व १९ मधील किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी येथील नाल्यामधील जलनिस्सारण नलिका दुरुस्ती व इतर जलनि:सारणविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ५७ लाख २६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. जलक्षेत्र क्रमांक ड १,२,३,४ अंतर्गत व्हॉल्व्ह आॅपरेशन करण्यासाठी कर्मचारी पुरविण्याकामी येणाºया सुमारे एक कोटी १२ लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलक्षेत्र क्रमांक ९ ते १५ पाण्याच्या टाकीवरील वितरण व्यवस्थेसाठी मजूर पुरविण्यासाठी ९७ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. जलक्षेत्र क्रमांक १ ते ८ पाण्याच्या टाकीवरील वितरण व्यवस्थेसाठी मजूर पुरविण्यासाठी ६१ लाख ६४ हजारांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:47 AM