शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

रिंग रोखल्याने ४२ लाख वाचणार, आयुक्तांची दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:20 AM

वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी सर्वनिविदा पाकीट उघडावेत, असे आदेश दिले. त्यानंतर उर्वरित पाकिटे उघडल्याने महापालिकेचे ४२ लाख रुपये वाचले आहेत.

पिंपरी : वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी सर्वनिविदा पाकीट उघडावेत, असे आदेश दिले. त्यानंतर उर्वरित पाकिटे उघडल्याने महापालिकेचे ४२ लाख रुपये वाचले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या रस्तेविकास कामांत रिंग झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले आहे. असे असताना शिवसेनेने सोमवारी आणखी एकाप्रकरणात रिंग झाल्याचा आरोप केला होता. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनानिवेदन दिले आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर याप्रकरणी काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन मुख्यलेखापालांचा अहवाल, आणि तरतुदीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व निविदा उघडाव्यात असेही आदेश दिले. त्यामुळे कमी दर असणाºया राहुल कन्स्ट्रक्शनला काम मिळाले. यातील पाच ठेकेदारांपैकी राहुल कन्स्ट्रक्शनने २२ टक्के, एसएस साठे कंपनीने नऊ टक्के, यश कीर्ती असोसिएटने एक टक्के कमी दराने आणि एसबी सवई यांनी १ टक्के, पांडुरंग एन्टरप्रायजेसने २ टक्के जादा दराने निविदा भरल्या होत्या.सर्वच निविदा उघडल्याने २२ टक्के कमी दर असणाºया राहुल कन्स्ट्रक्शनला काम मिळाले आहे. हे काम दोन कोटी ९० हजारांचे असून रिंग झाली असती, तर उर्वरित तिघांपैकी यशकीर्तीला एक टक्के कमी दराने काम दिले गेले असते. आयुक्तांनी सर्व निविदा उघडण्याचा निर्णय घेतल्याने २२ टक्के दराची निविदा पात्र धरण्यात आली. त्यामुळे सुमारे ४२ लाखांचे जनतेचे पैसे वाचले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.अशी झाली निविदा प्रक्रियेत रिंगवाकड येथील आरक्षण क्रमांक ४/११ येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत घालण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा पालिकेने १५ ते ३० डिसेंबरला प्रसिद्ध केली. कालावधीत सहा जणांनी निविदा भरली. त्यापैकी एका ठेकेदाराने काही कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि पात्र निविदा धारकांची यादी १९ जानेवारीला महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात पाच ठेकेदार पात्र ठरले होते. त्यापैकी राहुल कन्स्ट्रक्शन यांनी १८ जानेवारी व एस. एस. साठे यांनी २० जानेवारीला निविदा ही चुकीने बिड केली असून, ती उघडू नये तसेच आमची ईएमडी व पीएसडी परत मिळण्याची विनंती केली होती. त्यापैकी दोघांनी निविदा पाकीट उघडू नये, अशी पत्रे दिली आहेत. परंतु, ही पत्रे राजकीय दबावातून दिली. यामध्ये रिंग झाली आहे.पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यासाठी ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उघडण्यात याव्यात, अशीही मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार मुख्य लेखापाल यांचे अभिप्राय घेऊन फेरसादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. शिवसेनेच्या आक्षेपांची दखल घेऊ असे सूचित केले होते.वाकड येथील कामात रिंग झाल्याचा आरोप केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतली. सर्वच निविदा उघडल्याने रिंग करणाºयांचा डाव फसला. यामुळे २२ टक्के कमी दराची निविदा स्वीकारली. त्यामुळे ४२ लाख वाचले आहेत. त्याबद्दल आयुक्तांच्या निर्णयाचे अभिनंदन. यापूर्वीच्या प्रकरणांतही असेच निर्णय आयुक्तांनी घेतले असते, तर कोट्यवधी रुपये वाचले असते.- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड