पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन कोटी रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. यात महिलेची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली. हा सारा प्रकार तीन मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत वाकड येथे घडला.
याप्रकरणी बुधवारी (दि.१६) महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जेसीबी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर राहुल गुलाबसिंग जाखड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला जेसीबी कॅपिटल व जेसीबी ॲग्रोटेक या दोन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यामध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष त्याने दाखवले. फिर्यादी महिलेने ५० लाख रुपये चेकद्वारे आरोपीला दिले. या बदल्यात दोन कोटी परत करण्याचा करारनामा ही केला. मात्र अद्याप कोणतीच रक्कम परत न करता आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे