लोणावळा : पवनानगर (लोणावळा) जवळ कोथुर्ने गावात नदीपात्राशेजारी एका घरात 7 माणसं व बाजूला गोठ्यात सुमारे 30 गाई म्हशी पाणी वाढल्यामुळे अडकून पडल्या होत्या, पाणी वाढतच राहिल्याने सगळ्यांचे जीव धोक्यात होते. याबाबतची माहिती समजल्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाने प्रयत्नांची शर्त करुन सर्व सात माणसं व 30 जनावरे पाण्यातून सुखरुप बाहेर काढली. मुक्या जनावरांचा जिव वाचविल्यानंतर गोठ्याचे मालक रामचंद्र नढे व ग्रामस्थांनी शिवदुर्ग रेस्कु टीम चे कौतुक केले व रुपये 51,000 रोख स्वरूपात देवून संस्थेचा गौरव केला.
शिवदुर्गची टीम आनंद गावडे, राजेंद्र कडू, महेश मसने, दिनेश पवार, राहुल देशमुख, प्रणय अंभोरे, केदार देवाळे, विकास मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, तुषार सातकर, रोहीत वर्तक, रितेश कुडतरकर, सुनिल गायकवाड हे दोन दिवस हे रेस्कू कार्य करत होते.