कामशेत : संवेदनशील घोषित केलेल्या कामशेत (खडकाळा) येथे सकाळी संथगतीने मतदान सुरु झाले. सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.सकाळी उमेदवारांकडून मतदान यंत्रांची पूजा करण्यात आली. सुरुवातीला मतदान संथ गतीने सुरू होते. शहरातील बहुतेक नोकरदारांनी सकाळी मतदान केले.मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी हाणामारी, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा खून, दंगल, जाळपोळ, बूथ फोडणे, व्होटिंग मशिन फोडण्याचा प्रकार झाल्याने कामशेत (खडकाळा) हा भाग संवेदनशील विभाग म्हणून घोषित केल्याने शहरात निवडणुकीच्या आदल्या दिवसापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खडकाळा गणातील साई, पारवडी, नाणोली, खडकाळे, खामशेत, कान्हे, नायगाव, जांभूळ, सांगवी, कुसगाव खुर्द आदी गावांमध्ये शांततेत मतदान झाले. सकाळी सकाळी अनेक ठिकाणी संथगतीने मतदान सुरु असल्याचे चित्र दिसत होते. खडकाळे गणात एकूण १५८१२ मतदार संख्या असून, यात ७५२३ महिला व ८२८९ पुरुष मतदार आहेत. खडकाळे गणात सकाळी ७ : ३० ते ११ : ३० पर्यंतच्या पहिल्या फेरीत २१.१४ टक्के मतदान झाले असून यात ११५८ स्त्री व २१८५ पुरुष मतदार असे एकूण ३३४३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान संथ गतीने सुरु होते. तसेच दुपारी १:३० पर्यंत ३८.८२ टक्के मतदान पूर्ण झाले असून यात २७४४ महिला व ३३९५ पुरुष मतदार असे एकूण ६१३९ मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ : ३० पर्यंत ५३. ६२ टक्के मतदान झाले असून यात ३९९८ महिला व ४४८१ पुरुष मतदार असे एकूण ८४७९ मतदारांनी मतदान केले.
कामशेतमध्ये ६५ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:51 AM