पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे. सत्ताधारी भाजपाने चार जणांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ड्रॉ काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु, सभा दुपारी दोन वाजता होणार होती. ती तीनला सुरू झाली. त्यामुळे स्थायीतील भाजप नगरसेवकांमध्ये खलबते सुरू होती. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळेच सभेला उशीर झाल्याची चर्चा होती. सभेत ड्रॉ. काढण्यात आला. त्यात भाजपाच्या सभापती सीमा सावळे, आशा शेंडगे, हर्षल ढोरे, कोमल मेवाणी, उषा मुंढे, कुंदन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे या दहा जणांच्या नावाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत निवड केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण बाहेर; भाजपातील तिघांचा समावेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 5:48 PM
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे.
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्यनवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत केली जाणार निवड