पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे ५४२ उमेदवार असून, २३१ अपक्ष उमेदवार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांपैकी ८९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २७३ गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ६०८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये महापालिका शाळा व इमारतींचा समावेश असून, १५९ महापालिका शाळा, ३२४ खासगी इमारती, १ शासकीय व २ एमआयडीसी इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा समावेश आहे. त्यासाठी प्रशासकीय नियोजन अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.महापालिका निवडणूक २१ फेबु्रुवारीला होत असून, त्यासाठीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वैशाली जाधव-माने आदी उपस्थित होते. मतमोजणीप्रक्रिया शांततापूर्ण व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी एकूण ८ हजार ९२५ कर्मचारी व १ हजार ७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १० हजार ७१० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून, सर्वांना त्यांच्या कामकाजाबाबत प्रशिक्षणही दिले आहे.(प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांपैकी ८९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २७३ गुन्हे दाखल आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. - दिनेश वाघमारे, आयुक्त, महापालिका१६० उमेदवारांना नोटीस उमेदवार खर्च नियंत्रणासाठी प्राप्तिकर विभागातील पाच निवडणूक निरीक्षकांच्या व विक्रीकर विभागातील पाच सहायक निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ज्या उमेदवार व पक्षांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही अशा १६० उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे.८८ मतदान केंद्र संवेदनशील शहरातील ८८ मतदान केंद्रांवरील ३७३ बूथ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी दिली. अशा ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. यासह गस्त वाढविण्यात येणार असून, शहरात येणाऱ्या तडीपार गुन्हेगारांचा शोध घेणे यासह ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन राबविले जात असल्याचे ते म्हणाले.आचारसंहिता तक्रारींसाठी सुविधाआचारसंहिता भंगाची तक्रार सोप्या पद्धतीने करता यावी व अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी कमीत कमी वेळेत पूर्तता करता यावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सिटीझन आॅन पोर्टल (सीओपी) हे मोबाइल अॅप कार्यान्वित केले आहे. व्हॉट्स अॅप ७४४ ७७५ १३७२ या क्रमांकावर फोटो, व्हिडिओ शूटिंग पाठवून तक्रार करता येऊ शकते. आचारसंहिता भंगाविषयी तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ८९ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 18, 2017 3:26 AM