शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मोरया गोसावी मंदिर परिसरात सुशोभीकरणाला ९ कोटींचा खर्च होणार; दोन टप्प्यात मार्गी लागणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:59 PM

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.

पिंपरी : चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंत सुमारे दीड किलोमीटर परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम करणाऱ्या ठेकेदारालाच दुसऱ्या टप्प्यातील काम दिले आहे.चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हजारोंच्या संख्येने भाविक दररोज मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी येतात.क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मृती जतन व्हाव्यात, उद्याच्या पिढीला त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावे, यासाठी हे शिल्पसमूह महत्त्वपूर्ण ठरत आहे. थेरगाव बोट क्लब येथे केजूबाई बंधारा हा निसर्गरम्य परिसर आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.पिंपरी - चिंचवड महापाालिकेतर्फे चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ११ कोटी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या. सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एच. सी. कटारिया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २२.६ टक्के कमी दर सादर केला. त्यानुसार, ८ कोटी ९६ लाख रुपये अधिक ५ लाख २३ हजार रुपये मटेरियल टेस्टींग शुल्क असे ९ कोटी १ लाख रुपये या सुशोभीकरणासाठी खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.---जुन्याच ठेकेदाराला काममोरया गोसावी मंदिर ते थेरगाव बोट क्लबपर्यंत सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम एच. सी. कटारिया या ठेकेदारालाच देण्यात आले होते. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च झाला. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवूनही दुसऱ्या टप्प्यातील कामही त्याच ठेकेदाराला मिळाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड