'मविआ' घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल; अजित दादांनी ठामपणे सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 09:15 AM2023-02-07T09:15:26+5:302023-02-07T09:15:33+5:30
चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल असे ठामपणे सांगितलं आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तास उरले आहेत. मात्र, अजूनही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेले नाही. याबाबत पिंपरी चिंचवड मधील कीवळे येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांची पवार यांनी संवाद साधला.
पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल.'' त्यावर उमेदवार राष्ट्रवादीचा असेल की आयात असेल असा प्रश्न केला. पवार म्हणाले, '' आयात असेल का ? फलाना असेल का ? तुम्ही काय मला मूर्ख समजता का. जो उमेदवार दिला जाईल त्याचे नाव लवकर सांगूच.'