शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Sant Tukaram Maharaj palkhi:आषाढी वारीच्या परतीचा प्रवास संपला! तुकोबा देहुनगरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 5:14 PM

ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालत पालखी रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले.

देहूगाव : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळा 35 दिवसांची आषाढी वारी संपवुन पंढरपूरहुन आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देहूनगरीत दाखल झाले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीचे प्रवेशद्वार कमानीमध्ये मोठ्या उत्साहात व मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. माळीनगर मध्ये ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालुन व पालखीसोहळ्यावर आणि पालखी रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले.  

पालखी मंदिरात पोहचल्यानंतर भाविकांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी महाद्वार कमानीमध्ये(पूर्वीची वेस) आल्यानंतर येथील तुपे कुटुंबियांकडून दही भाताचा नैवद्य दाखवून बैलाचे व पालखी रथाचे पुजन व औंक्षण करूण स्वागत केले. तत्पुर्वी पालखी चिंचोली येथील शनीमंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली होती. दुपारी एकच्या सुमारास पालखी विसावा संपवुन देहूकडे मार्गस्थ झाली. पालखी नेहमी प्रमाणे बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वबंर महाराज मंदिरा समोर आल्यानंतर 'श्री संताचीये माथा चरणावरी सांष्टांग हे करी दंडवत' या अभंग गायन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महारांजांची आरती घेतली. 

पालखी महाद्वारात आल्यानंतर 'तुझे द्वारीचा कुतरा / नको मोकलू दातारा // धरने घेतले दारात नको /उठवू धरोनी हात //' प्रथेप्रमाणे अभंग घेवून पालखीने मंदीरात प्रवेश केला.  मंदीराच्या आवारात प्रदक्षिणा घालून पालखी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदीरापुढे आली. येथे अभंग गायन झाल्यानंतर महारांजांची आरती झाली. पालखी भजन मंडपात आल्यानंतर संत नामदेव महाराजांचा 'देह जावा अथवा राहो / पांडूरंगी दृढ भाव // चरण न सोडी सर्वथा / आण तुझी पंढरीनाथा //'हा अभंग गायला. या अभंगानंतर वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देवून पालखी सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे उपस्थित होते. संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी मार्गावर वहातूक व्यवस्था व पोलीसांचा बंदोबस्त चोख होता. मार्ग पालखी गावाच शिरताच देहू आळंदी रस्त्यावरील वहातूक मोकळी केल्याने त्यातच पालखी सोहळ्यात सहभागी झालेली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी उभी केली असल्याने वहातूक खोळंबली होती.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Socialसामाजिक