शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

भाजपात आयारामांना उमेदवारी

By admin | Published: February 03, 2017 10:35 PM

भाजपात आयारामांना उमेदवारी

 

 

 

निष्ठावानांमध्ये नाराजी : शहरातील ३३ नगरसेवकांचे ऐनवेळी पक्षांतर 

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी याद्यांचा घोळ शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान ४३ नगरसेवकांना उमेदवारी देताना काही नगरसेवकांचे पत्ते कट केले. काँग्रेसने दोन विद्यमान नगरसेवकांना उमेदवारीसह ७० जागा लढविल्या आहेत. भाजपाने मूळ कार्यकर्त्यांना टाळून राष्टÑवादीतून आयारामांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. १२८ जागा आणि ३२ प्रभागांची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी राष्टÑवादी काँग्रेसच्या ८२ पैकी १७ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तर काँग्रेसच्या १३ पैकी १०, शिवसेनेच्या १५ पैकी ४, मनसेच्या ४ पैकी २, नऊ अपक्षांपैकी २ नगरसेवकांनी राजीनामा दिला. एकूण ३३ नगरसेवकांनी राजीनामा देऊन पक्षांतर केले. 

शेवटच्या घटकापर्यंत यादीचा घोळ सुरू होता. उमेदवारांची पळवापळवी सुरू होती. त्यामुळे भाजपाने रात्री उशिरापर्यंत यादी माध्यमांना दिली नाही. राष्टÑवादी काँग्रेसने महापौर शकुतला धराडे यांच्यासह ४३ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसमधून आलेल्या सात जणांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दोन विद्यमान नगरसेवकांसह ७० जागांची यादी जाहीर केली आहे. त्यात नवीन चेहºयांना संधी दिली आहे. शिवसेनेने  सर्वच नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. तीनही पक्षांत नवीन चेहरे अधिक आहेत. तसेच भाजपाने अन्याय केल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाने केला आहे. वीस जागांपैकी केवळ चार जागा दिल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

भाजपा निष्ठावंताची पत्ते कट... 

भाजपाने माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, स्वाती काटे, प्रकाश जवळकर, अमोल थोरात, दीपक जाधव या जुन्या कार्यकर्त्यांची उमेदवारी कापली आहे. उमेदवारी यादी माध्यमांना देण्यास टाळाटाळ करण्यात आली. निष्ठावंतांना डावलल्याने भाजपात अस्वस्थता आहे. सर्वच पक्षांनी घराणेशाहीला काही प्रमाणात प्राधान्य दिल्याचे यादीवरून दिसून येत आहे. तसेच उमेदवारी मिळणार नसल्याने राष्टÑवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता पालांडे यांनी भाजपातून उमेदवारी स्वीकारली, तर क्रीडा समितीचे माजी सभापती जितेंद्र ननावरे यांनी ऐनवेळी दुसºया पक्षातून उमेदवारी घेतली आहे.