शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

‘ती’च्या हस्ते गणरायाला साकडे, अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांनी केली आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:44 AM

आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले...नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी गायनसेवा अर्पण केली

पुणे : आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले...नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी गायनसेवा अर्पण केली...स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला ‘ती’ने नव्याने झळाळी दिली...बँकर, गायिका, समाजसेविका आणि मुख्यमंत्र्यांची पत्नी अशी नानाविध ओळख असलेल्या ‘ती’च्या सुरांनी आज ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सायंकाळ मंगलमय झाली. ‘ती’च्या सुरांनी गणरायाला आवाहन करण्यात आले आणि स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीची नव्याने प्रचिती आली. ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘ती’चा गणपतीची आरती सोमवारी अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत पार पडली.पूजाअर्चा, परंपरांमध्ये कायम पुरुष अग्रणी आणि स्त्री मागे, असे चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळत असताना, ‘लोकमत’ने गेल्या ५ वर्षांपासून रुजवलेल्या समानतेच्या चळवळीला झळाळी मिळत आहे. प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व विधी ‘ती’च्या हस्ते करुन ‘लोकमत’ने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी अमृता देवेंद्र फडणवीस, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, गायक रुपकुमार राठोड, रोझरी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूटचे विवेकअरान्हा, चंद्रलेखा अरान्हा, विनय अरान्हा, दिप्ती अरान्हा, सिमरन जेठमलानी, आॅरेंज काऊंटीच्या संचालक सपना छाजेड, पीएफटी हॉलिडेजच्या नीलम खेडलेकर, धीरेंद्र अ‍ॅडर्व्हटायझिंगचे धीरेंद्र सेंगर आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडली. यावेळी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, व्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित होते.अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘गणरायाची आरती केल्यानंतर शांत आणि समाधानी वाटत आहे. ओतप्रोत भक्तीने प्रेरित होऊन ‘ती’च्या हस्ते गणरायाची आरती होत असून, या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. स्त्रीला सक्षम आणि सशक्त करणारा हा उपक्रम आहे. स्त्री अनेक क्षेत्रे पादाक्रांत करत असताना, आजही अनेक ठिकाणी तिला दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, आम्ही पुरुषांप्रमाणेच सर्व जबाबदाºया जिद्दीने पार पाडू शकतो, गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व कामे करु शकतो, हे स्त्रियांनी दाखवून दिले आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक रीत समाजासमोर येत आहे. स्त्रिया अधिक प्रतिभावान असतात. ही प्रतिभा सिध्द करण्याची संधी त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. अशा चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांचे एकत्रीकरण करण्याची नितांत गरज आहे.फडणवीस यांनी ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ तर रुपकुमार राठोड यांनी ‘जय गणेश, जय गणेश देवा’ या गाण्यातून गणराया चरणी गायनसेवा अर्पण केली. एकीकडे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत असताना, नारीशक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘लोकमत’ने उचललेले पाऊल ही पुरोगामित्वाची चाहूल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.लोकमतच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या ‘ती’ चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतूनच मिळाली. स्त्रियांना सन्मान मिळावा, या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी पुण्यात सुरु केलेल्या या उपक्रमाला सुरुवातीला खूप विरोध झाला. परंतु, लोकमत आपल्या हेतूशी कटिबध्द होता. आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘ती’चा गणपती उपक्रम सुरु झाला आहे. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लोकमतने सुमारे २५ वर्षांपासून जनजागृती केली आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाचा एक भाग असलेल्या ‘आर‘ती’चा ताससाठी तब्बल दीड लाख महिलांनी सहभाग नोंदवला. लोकमत नेहमी स्त्री सक्षमीकरणासाठी पुढे आला आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, लोकमत ‘ती’चा गणपती हे उपक्रम याचाच एक भाग आहे. यातूनच स्त्री सक्षमीकरणाची चळवळ सशक्त होणार आहे.- विजय दर्डा 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव