पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे अशा कोणत्याही पक्षाने उमेदवारीयादी जाहीर केलेली नाही. मात्र, उमेदवारीयादी जाहीर झाल्यानंतर होणारी बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय पक्षांकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीवेळी पक्षाचे अधिकृत उमेदवारी फॉर्म उमेदवारांना देण्याचा फंडा राजकीय पक्षांनी अवलंबिला आहे.
महापालिकेची ३२ प्रभागांसाठी निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, उमेदवारीअर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली आ
हे. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाºयांची कार्यालये असून, त्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. उमेदवारीअर्ज सादर करण्याचा आजचा पाचवा दिवस होता. मात्र, अजूनही काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, एमआयएम, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष अशा कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही.
भाजपा-शिवसेनेच्या युतीच्या गुºहाळावर पडदा पडला आहे, तर स्वबळाची भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीविषयी चर्चा सुरू आहे. मंगळवारी रात्री याबाबत बैठक होणार आहे. काँग्रेसला किती जागा द्यायच्या यावर चर्चा सुरू आहे. बुधवारी आघाडीबाबत निर्णय होईल, असे राष्टÑवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ‘पहले आप’ची भूमिका बजावत आहेत. कोण अगोदर यादी जाहीर करतेय त्यावर एकमेकांचे उमेदवार ठरणार आहेत. तसेच उमेदवारांची पळवापळवी केली जाणार आहे.
एबी फार्म कोणाला मिळणार?