कामशेत : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बउर गावाच्या हद्दीत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला पिकअपने मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमोल सुभाष मोरे ( वय ३० रा. रासीवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) याचा जागीच मृत्यु झाला. तर पिकउप मधील सुमारे १६ मेंढ्यांचा मृत्यु झाला असून ७ ते ८ मेंढ्या जखमी आहेत. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि.२७) रोजी अलिबाग वरुन दगडी कोळसा भरून निघालेला ट्रक ( क्र. एम एच १२ एफ झेड ४७५१ ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बउर गावाच्या हद्दीत किलोमीटर नंबर ७६/६०० जवळ ट्रकचा पाठीमागील बाजुचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा करण्यात आला हाेता. पहाटे सुमारे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भरदाव वेगाने येणाऱ्या पिकउप गाडी ( क्र. एम च ०९ सि ए ५१६६) ने ट्रकला मागून धडक दिल्याने त्यातील डाव्या बाजुला बसलेल्या अमोल सुभाष मोरे ( वय ३० रा. रासीवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) याचा जागीच मृत्यु झाला तर चालक रमजान बाबसो सय्यद ( रा. किकपुरी ता. राधानागरी जि. कोल्हापुर ) हा किरकोळ जखमी झाला असून पिकअप मधील सुमारे १६ मेंढ्यांचा मृत्यु झाला असून काही ७ ते ८ मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी आहे. याप्रकरणी पुढील तपास ए एस आय मचिंद्र मागते करत आहेत.
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात ; एकाचा मृत्यू तर 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:48 PM