पिंपरी : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या खंडणी-दरोडा विरोधी पथकाने गुरुवारी (दि. २६) ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (वय ३५, रा. आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे. खंडणी-दरोडा विरोधी पथकाकडून गुरुवारी गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी आरोपी यादव आकुर्डी येथे थांबलेला असल्याची माहिती गस्तीवरील पथकातील पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार आकुर्डी येथे जाऊन पोलिसांनी आरोपी यादव यास ताब्यात घेतले. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. २०१५ पासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी यादव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. निगडी, चिंचवड व पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्याव गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी- दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी निशांत काळे, शरीफ मुलाणी, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे व सुधीर डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 7:45 PM