पिंपरी : खराळवाडीत सुहास हळदणकर या कार्यकर्त्याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये काहींना कोणाच्या तरी सांगण्यावरून अडकविण्यात आले आहे. खुनाची घटना घडली त्या वेळी तेथे हजर नसलेल्या तरुणांची नावे फिर्यादीत गोवण्यात आली आहेत. असा आरोप माजी नगरसेविका निर्मला कदम यांनी केला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, त्या फुटेजमध्ये दिसून न येणाऱ्यांनाही आरोपी केले आहे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी; परंतु या प्रकरणाशी संबंध नसलेल्यांना चौकशी करून सोडून द्यावे, अशी मागणी खराळवाडीतील महिलांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी घटनास्थळासह फिर्यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांच्या घराजवळचे, कार्यालयाचे फुटेज मिळविले आहे. खुनाची घटना घडली, त्या वेळी जे तरुण शहरातच परंतु बाहेर हॉटेलमध्ये जेवण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. घटना घडली त्या वेळी घटनास्थळी जे फिरकले नाहीत, त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. खराळवाडीत क्षेत्रीय सभेत ज्यांनी गोंधळ घातला होता. त्यातील काहींचा या खूनात थेट संबंध आहे, असा संशय निर्मला कदम यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
पिंपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आरोप
By admin | Published: April 26, 2017 3:55 AM