पिंपरी : सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणणाºयावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कारवाई केली असून, १४ पोलीस स्टेशनांतून गेल्या वर्षभरात १३२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहेत. आयुक्तालयामुळे गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम होत आहे. पोलीस आयुक्तालयामुळे संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धही कमी झाली आहेत. औद्योगिकनगरी म्हणून परिचित असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय सुरू होऊन दीड वर्ष होत आले आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयांमुळे कर्मचारी संख्या वाढली आहेत. तसेच गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १३२ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत हा तडीपारीचा कालावधी आहे. ९० गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी, ६ गुन्हेगारांना दीड वर्षासाठी, २४ गुन्हेगारांना एक वर्षासाठी, तर १२ गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ - १ मधून ७५, तर परिमंडळ - २ मधून ५७ गुन्हेगारांना तडीपार केले आहे.......
टोळीयुद्धाच्या घटना घटल्याप्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होतो. त्यातच पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगार दत्तक घेण्याची योजना सुरू केले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना पोलिसांनी दत्तक घ्यायचे आणि त्यांच्यावर बारीक लक्ष द्यायचे. वेळोवेळी त्याची तपासणी करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात टोळीयुद्धासारख्या घटना घडलेल्या नाहीत, असा पोलिसांचे म्हणणे आहे.पोलीस ठाणी तडीपार पिंपरी विभागनिगडी ०६भोसरी ०३पिंपरी १४चिंचवड ०९एमआयडीसी भोसरी २०चाकण विभागआळंदी ०६चाकण ०९पोलीस ठाणी तडीपारदिघी ०८वाकड विभागसांगवी १२वाकड १९हिंजवडी ०८देहूरोड विभागदेहूरोड १०चिखली ०२तळेगाव ०६