- प्रकाश गायकरपिंपरी : शाळा सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना स्कूल बसतपासणी व पासिंगसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये गर्दी होत आहे. स्कूलबसच्या वाहनांमध्ये १५ जूननंतर काही त्रुटी आढळल्यास वाहनजप्तीची कारवाई करण्यात येईल, त्यासाठी ज्या स्कूल बसची तपासणी किंवा पासिंग बाकी आहे, अशा स्कूल बसमालकांनी शनिवारी व रविवारीदेखील तपासणी करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.ज्या स्कूल बसमालकांच्या वाहनाची तपासणी बाकी आहे, त्यांनी त्वरित तपासणी करवून घ्यावी. त्याचप्रमाणे गाडीचे पासिंग करण्यासाठी ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली नाही अशा वाहनमालकांनी थेट येऊन गाडी पासिंग करवून घ्यावी. विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहन देण्यासाठी नोंदणी व तपासणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पालकांनी मुले वैध शालेय परवाना असलेल्या स्कूल बसमधूनच पाठवावीत. खासगी व अवैध वाहनांचा वापर टाळावा.’’- आनंद पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवडजे वाहनचालक परवानगी न घेता व नियमाविरुद्ध विद्यार्थी वाहतूक करतात, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आम्ही नियमित प्रबोधन करीत असतो. सद्य:स्थितीत ९५ टक्के गाड्या अधिकृत झाल्या आहेत.’’- राकेश नल्ला, सचिव,पिं.-चिं. अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटनाउपप्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या आवाहनानुसार ‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनांची तपासणी करून घ्यावी, तसेच वाहन शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार असणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाचा विमा, कर, परवाना आदी वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत. त्याचप्रमाणे अग्निशामक यंत्र, प्रथमोचार पेटी, सेफ्टी डोअर असणे आवश्यक आहे. मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनिसाची नेमणूक करणे अनिवार्य आहे.तेरापेक्षा जास्त आसनक्षमता असणाºया वाहनांमध्ये एक मदतनीस आवश्यक आहे. आपले वाहन या अटींची पूर्तता करत असल्यास उपप्रादेशिक कार्यालयात आपल्या वाहनाची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ जूननंतर वाहनांच्या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास वाहन तपासणी दरम्यान चालक-मालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास वाहन मालक-चालक व सदर शाळा जबाबदार राहील.
स्कूल बस तपासणीला वेग, त्रुटी आढळल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:03 AM