शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By admin | Published: March 25, 2017 3:48 AM

महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४६ पवनानगर

रहाटणी : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४६ पवनानगर, काळेवाडी येथील सलग दोन दिवस कारवाई करून ३७ नवीन सुरू असलेल्या आरसीसी व वीट बांधकामावर, तसेच पत्राशेड, पूररेषेतील, हरित पट्ट्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ३५ हजार ६०० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. विजयनगर येथील पूररेषेतील ५५०० चौरस फुटांचे एका कार्यालयाचे शेड व १२०० चौरस फुटांचे वीट बांधकाम पाडण्यात आले. तसेच पवनानगर गल्ली क्रमांक एकमधील हरितपट्ट्यातील नवीन सुरू असलेले आरसीसी बांधकाम व वीट बांधकाम अशी ५००० चौरस फुटांची सात बांधकामे जमीनदोस्त झाले. अल्फान्सो शाळा परिसरातील निवासी क्षेत्रातील ७००० चौरस फुटांची सहा बांधकामे पाडण्यात आली. पवनानगर गल्ली क्रमांक १, २ व ३ मधील हरित पट्ट्यातील १६९०० चौरस फुटांचे २२ आरसीसी अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. (वार्ताहर)दर्जाहीन कामे ४महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा सपाटा लावला होता. फक्त घर बांधायचे म्हणून बांधायचे अशी परिस्थिती होती. कोणत्याही प्रकारचा दर्जा नसलेली कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत व झाली आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एखादा अपघातही होऊ शकतो. ऐन निवडणुकीच्या काळात पाडापाडीची मोहीम पालिकेने हाती घेतली नव्हती. त्यामुळे पालिका काही करणार नाही, या समजाने नागरिकांनी संधीचा फायदा उठवीत अनेकांनी बांधकामे करून घेतली. अधिकाऱ्यांचा चंग४मात्र निवडणुकीचे वारे शांत होताच अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा पालिकेच्या संबंधित विभागाने चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या क्षेत्रीय कार्यालय अ,ब,क व ड याच परिसरात कारवाईचा जोर दिसून येत आहे. इतर भागात कारवाई दिसत नाही.