पिंपरी : प्लास्टिक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून आज क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्यविभागाने केलेल्या कारवाईत सात किलो प्लास्टिक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर एम भोसले व आरोग्यनिरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने सकाळी ही कारवाई केली. मासुळकर कॉलनी परिसरातील विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असतांना तीन व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे सात किलो प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच पंधरा हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरीत प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 7:18 PM
पिंपरी परिसरात विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असताना तीन व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले.
ठळक मुद्देकारवाईत सात किलो प्लास्टिक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल