शिरूर : महसूल पथकाने अनधिकृत वाळूवाहतुकीवर कारवाईचा उगारलेला बडगा तसाच ठेवताना शनिवारी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर चौक, कान्हूर मेसाई, कवठे येमाई टाकळी हाजी व पाबळ या भागात वाळूवाहतूक करणा:या 16 ट्रक, ट्रॅक्टर व एका जेसीबीवर कारवाई करून, ते पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी सांगितले.
अनधिकृत वाळूवाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार पोटे यांनी महसूल पथक तयार केले आहे. या पथकाने 1 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 11 व 13 ट्रकवर कारवाई केली होती. या पथकाने तालुक्यातील उपरोक्त नमूद भागात याच प्रकारे कारवाई करताना 16 अनधिकृत वाळूवाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेतले. सर्व ट्रक संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोटे यांनी सांगितले.
एमएच 12 एफङोड 634क्, एमएच 12 एफसो 544क्, एमएच 12 एफङोड 7413, एमएच 12 एफ 544क्, एमएच 14 ऐएस 6817, एमएच 12 एचडी 1429, एमएच 12 एचडी 2783, एमएच 12 एचडी 5122, एमएच 12 एचडी 5452, एमएच 12 डीजी 9क्48, एमएच 12 सीटी 9422, एमएच 12 क्यूङो 8954, एमएच 12 डीजी 477क्, एमएच 12 डीटी 747क्, एमएच 12 एफसी 7545 असे कारवाई करण्यात आलेल्या ट्रकचे नंबर आहेत. कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे तहसीलदार पोटे यांनी सांगितले.
देऊळगावराजे : दौंड तालुक्यात ठिकठिकाणी बेकायदा वाळू वाहतूक करणा:या 44 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, याकामी 8 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.
या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या पात्रत बेकायदा वाळूउपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथक आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)
शेतक:यांनाही दमदाटी; माफिया करताहेत शेतामधून वाळूउपसा
4राहू : वाळकी (ता. दौंड) येथे भीमा नदीपात्रत बेकायदा वाळू उपसा होत आहे. याचा नाहक त्रस नदीकाठच्या शेतक:यांना सहन करावा लागत आहे. वाळूतस्कर हे शेतक:यांच्या शेतामधून दादागिरी करुन वाळू उपसा करीत
आहे. वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी घाबरत
असल्याची एकंदरीत परिस्थिती
आहे. वाढती दादागिरी कोण रोखणार की परिस्थिती अशीच सुरु राहिली तर यामधून काही प्रकार घडण्याची
शक्यता व्यक्त केली जात आहे.
4महसूल विभागाने वेळोवेळी छापे घालून वाळू वाहतूक दारांवर कार्यवाही केली आहे. महसूल विभाग मात्र फक्त वाळू वाहतुकदारांवर कार्यवाही करतात मात्र वाळूतस्कर हे राजकीय पुढा:यांचे हस्तक असल्याने ते खरे मलिदा लाटतात ते मात्र कार्यवाहीतून सुटतात. वाळू तस्कारांवरच ख:या अर्थाने महसूल विभागाने कार्यवाही केली तर याला पायबंद बसेल. वाळू तस्करांच्या विरोधात यापूर्वी आंदोलने करणारे काही ग्रामस्थही या तस्करीमध्ये गुंतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
4याठिकाणी भीमानदीपात्रत आलेगाव, वाळकी रांजणगाव या तीन गावांची शिव आहे. अधिकारी ज्या गावच्या हद्दीतील महसूल अधिकारी कार्यवाहीसाठी हजर असताता त्यावेळी ते वाळूतस्कर आपल्या लव्याजम्यासह दुस:या गावच्या हद्दीत पलायन करतात. आलेल्या अधिका:याने हे वाळूतस्कर ही तुमच्या गावची हद्द नसल्याचे फक्त सांगतात व वेळ मारुन नेतात. महसूल अधिकारी हाच ठेका घेऊन माघारी येतात, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.