शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
5
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
6
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
7
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
8
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
9
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
10
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
11
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
12
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
13
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
14
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
15
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
16
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
17
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
18
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
19
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
20
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

'सारथी पोर्टलवरील तक्रारींची दखल न घेतल्यास कारवाई' शेखर सिंह यांचा इशारा : तक्रारी वेळेत सोडविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 2:29 PM

सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.

पिंपरी : महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींची सोडवणूक वेळेत करायला हवी. कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी दिला.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सारथी पोर्टल, आपले सरकार, पीजी पोर्टल, सीएमओ पोर्टल अशा विविध तक्रार निवारण प्रणालींबाबत चर्चा झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अविनाश शिंदे उपस्थित होते. प्रश्न जलद सोडविण्याची गरजआयुक्त शेखर सिंह म्हणाले, सारथी पोर्टलवर नागरिक महापालिकेशी संबंधित तक्रारी नोंदवित असतात. नागरिकांचे प्रश्न जलद सोडविणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना त्या सुविधांविषयी नागरिकांचे मत काय आहे, याकडे महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातून नागरी समाधानाचा निर्देशांक वाढण्यासाठी मदत होत असते. सेवा सुविधांबद्दल नागरिक तक्रारी नोंदवित असतात. त्यावेळी संबंधित विभागाने तक्रारींचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांचे वेळेत सोडवायला हव्यात. त्याची नोंद ठेवायला हवी. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी तक्रारींची सोडविण्यावर भर द्यावा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड