शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पालिका निवडणुकीसाठी इच्छुक झाले ‘अ‍ॅक्टिव्ह’

By admin | Published: March 14, 2016 1:12 AM

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे.,तसतसे इच्छुकही ‘अ‍ॅक्टिव्ह’ होऊ लागले आहेत. विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे प्रमाण वाढले असून, मोठ्या व्यक्तींवर टीका

पिंपरी : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे.,तसतसे इच्छुकही ‘अ‍ॅक्टिव्ह’ होऊ लागले आहेत. विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे प्रमाण वाढले असून, मोठ्या व्यक्तींवर टीका, आरोप करण्याचे प्रकारही सध्या दररोज पाहायला मिळत आहेत. यासह आंदोलन, मोर्चा काढूनही इच्छुकांकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेण्यासह छोटे-मोठे उपक्रम राबविले जात आहेत. काही इच्छुक असे आहेत की, ते मतदारांना माहितीच नाहीत, की फारसे परिचितदेखील नाहीत. गेल्या पाच वर्षांत कधी नजरेस न पडणारे चेहरेही सध्या ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मतदारांचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देणे, मोर्चा, आंदोलन करणे, असे प्रकार सुरू झाले आहेत. वर्षानुवर्षे ज्या समस्येचे घेणे-देणेही नव्हते, अशा समस्या सोडविण्यासाठी इच्छुक आता जागे झाल्याचे दिसत आहे. कोणत्याही छोट्या-मोठ्या विषयाचे पत्रक काढून प्रसिद्धी मिळवायची अथवा चर्चेत यायचे, इतकाच त्यांचा उद्देश असल्याचे दिसते. वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे. आंदोलन करण्यासह छोट्या कारणांवरूनही पत्रकबाजी केली जात आहे. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वर्तमानपत्रांना प्रसिद्धीसाठी निवेदन देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. निवेदन दिले जाते, मागणी केली जाते; मात्र ती वस्तुस्थितीला धरून आहे की नाही, याचाही विचार केला जात नाही. केवळ निवेदन काढून प्रसिद्धी मिळवित आहेत. (प्रतिनिधी)