शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आरटीईच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त वसुली

By admin | Published: March 24, 2017 4:15 AM

आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांनी अतिरिक्त खर्चाची वसुली सुरू केली आहे, अशी तक्रार काही

पिंपरी : आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांनी अतिरिक्त खर्चाची वसुली सुरू केली आहे, अशी तक्रार काही पालकांनी केली आहे. मात्र, शासनाकडून आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा परतावा मिळत नसल्याने शाळेच्या अन्य उपक्रमांसाठीचा खर्च पालकांकडून घेतला जात असल्याचे शिक्षण संस्था संचालकांचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आरटीई प्रवेशाचा गोंधळ सुरू आहे. गेले पाच वर्ष शासनाकडून शैक्षणिक संस्थाना आरटीई अंतर्गत शैक्षणिक प्रवेश शुल्काचा परतावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच शासनाकडून फक्त शैक्षणिक शुल्क परतावा मिळणार आहे, विद्यार्थ्यांचा उर्वरित खर्च कसा करावा, असा प्रश्न शाळा व्यवस्थानपनासमोर आहे. आरटीई विद्यार्थ्यांच्या विविध शाळेतील उपक्रमांच्या खर्चाचा बोजा अन्य विद्यार्थ्यांवर टाकण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतला जात आहे. मात्र, आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चागंली नसते.पाल्यांना उच्चप्रतीचे शिक्षण मिळावे, यासाठी पालक आरटीईचे प्रवेश घेतात. मात्र, खासगी शाळांतील खर्च या पालकांना परवडत नाही. त्यामुळे संबंधित खर्चही शासनाने द्यावा, अशी पालकांची मागणी आहे. शाळेत पुरविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग आणि इतर सुविधांचा खर्च आरटीई प्रवेशातील विद्यार्थ्यांकडून आकारला जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, त्यामुळे शाळेत प्रवेश मिळूनही पालक हवालदिल झाले आहेत. याबाबत शासनाने योग्य निर्णय तातडीने घ्यावा, अशी पालकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)