पिंपरी : निविदा कालावधी संपण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रिया राबवायला हवी. किती वेळा मुदतवाढीचे प्रस्ताव आणता, यावरून प्रशासनाची बेफिकिरी दिसून येत आहे. कचराविषयक कामकाजांना मुदतवाढ देण्याच्या प्रश्नावरून स्थायी समितीने प्रशासनास धारेवर धरले. कच-याचे काम करणा-या पाच संस्थांच्या विषयांना तीन महिन्यांपर्यंत मुदतवाढीचा विषयास मंजुरी देण्यात आली. यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचेही सुनावले.महापालिकेतील भवनात स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषयपत्रिकेवर कचरा वर्गीकरण आणि संकलनाचे काम करणाºया सहा संस्थांना मुदतवाढ देण्याचा विषय समितीपुढे चर्चेसाठी होता. तसेच शहरातील रस्ते साफसफाईचे काम करणाºया ६५ स्वयंरोजगार संस्थांच्या कामांना मुदतवाढ देण्याचा विषय सभेसमोर चर्चेला आला होता. यावर माध्यमांनीही मुदतवाढीच्या विषयांवर प्रकाश टाकला होता. कचरा या विषयावर सुमारे तासभर चर्चा झाली.सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘मुदतवाढीचे विषय आणू नका असे वारंवार सांगितले आहे. तरी प्रशासन हे विषय आणत आहे. कोणत्याही निविदेची मुदत संपणार हे माहिती असताना सहा महिने अगोदरपासून त्यावर काम का होत नाही? ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात प्रशासनालाच रस दिसतो. स्थायीचे आदेश प्रशासन जुमानत नाही, ही चांगली बाब नाही. आता यापुढे कोणतीही मुदतवाढ खपवून घेतले जाणार नाही. कचºयाच्या प्रश्नावरून आजच्या बैठकीत प्रशासनास धारेवर धरले. झाडाझडती घेतली. यापुढे मुदतवाढीचे विषय खपवून घेतले जाणार नाहीत. एकदाच मुदतवाढ मिळेल. पाच संस्थांना ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर मुदतवाढीसाठी स्थायीपुढे येऊ नये.’’या संस्थांना दिली मुदतवाढकचरा गोळा करणे, वाहून नेणे, वर्गीकरण करण्याचे काम विविध संस्थांना दिले आहे. कचरा गोळा करण्याविषयीच्या बीव्हीजी कंपनीस तीन महिन्यांच्या मुदतवाढीसह, ड प्रभागातील कामासाठी सावित्रीबाई महिला स्वयंरोजगार संस्था, अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गोळा करणे, संकलन करण्यासाठी भारतीय महिला स्वयंरोजगार संस्था (पिंपरी), फ क्षेत्रीय कार्यालयातील कचरा सकंलनासाठी भारतीय महिला स्वयंरोजगार संस्था (पिंपरी) क्षेत्रीय कायालर्यांच्या हद्दीतील रस्ते साफसफाईचे काम करणाºया ६५ संस्थांच्या ९२५ कामगारांच्या कामास ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे.
कच-यावरून प्रशासनाची घेतली झाडाझडती, स्थायी समिती, पाच संस्थांच्या तीन महिन्यांपर्यंतच्या मुदतवाढीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:51 AM