पिंपरी : उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, अशी वकील संघटनेची मागणी होती. कोल्हापूरला खंडपीठ मंजूर झाले, पुण्याचा खंडपीठाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकिलांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले.पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पुणेकर यांच्यासह असोसिएशनचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे गुरुवारी वकिलांचे काम बंद होते. या आंदोलनात सुहासपडवळ, अतिश लांडगे, सुनील कड, संजय दातीर पाटील, गणेश राऊत, प्रसन्ना लोखंडे, विक्रम यादव आदींनी सहभाग घेतला.महाराष्टÑ शासनाने पुणे जिल्ह्यासाठी खंडपीठ मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले. सरकारने आश्वासन देऊन वकिलांची आणि नागरिकांची फसवणूक केली आहे. कोल्हापूरला खंडपीठ मंजूर झाले, ही चांगली बाब आहे; परंतु पुण्यातही खंडपीठाची आवश्यकता आहे. शासनाने पुण्यासाठी खंडपीठ व्हावे, यादृष्टीने दखल न घेतल्यास शासनाविरोधात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
वकिलांचे काम बंद आंदोलन, पिंपरी बार असोसिएशन, पुण्याला खंडपीठ मंजूर न झाल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:15 IST