रहाटणी : दुपारी एकची वेळ, गजबजलेला शिवार चाैक. सिग्नल हिरवा असल्याने एकमाेगाेमाग एक वाहने जात हाेती. अचानक एका दुचाकी चालकाने ब्रेक दाबले. काही कळायच्या आत त्याची दुचाकी पलटी झाली आणि दुचाकीवरील तरुन उडून पडला. केवळ डाेक्यात हेल्मेट हाेते म्हणून ताे तरुण वाचला. या अपघातानंतर ताे तरुण एकच वाक्य म्हणाला 'हेल्मेट हाेते म्हणून मी वाचलाे.'
सुजित भंडारे वय वर्ष बत्तीस राहणार आंबेगाव हा तरुण कामासाठी चाकण येथे गेला होता. चाकण वरुन परतत असताना ताे शिवार चाैकात आला. हिरवा सिग्नल असल्याने वाहने जाेरात जात हाेती. पिवळा सिग्नल पडला असताना पुढे जाण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. तेवढ्यात लाल सिग्नल लागल्याने तरुणाने जाेरात गाडीचे ब्रेक दाबले. त्यामुळे त्याची दुचाकी पलटी झाली. तरुण पंधरा ते वीस फूट लांब फेकला गेला. डाेक्यात हेल्मेट असल्याने त्याला कुठलीही इजा झाली नाही. तेथे असणाऱ्या तरुणांनी आणि पाेलीस वाॅर्डनने त्याला रस्त्यातून बाजूला घेतले. त्यावेळी केवळ हेल्मेट हाेते म्हणून मी वाचलाे असे ताे म्हणाला. तसेच सर्वांनी हेल्मेट वापरले पाहिजे असेही ताे यावेळी म्हणाला.
सुचिनचा दाेनदा अपघात झाला. दाेन्हीवेळेस केवळ हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचूल शकले. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हेल्मेट वापरावे असे आवाहन त्याने नागरिकांना केले.