शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पिंपरी महापालिका क्षेत्रातील आनंदनगरनंतर आता भाटनगरातही धोका; दिवसभरात २६ रूग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 8:17 PM

खराळवाडी झोपडपट्टीनंतर आनंदनगर आणि आता भाटनगर झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव

ठळक मुद्देदिवसभरात २६ रूग्णांची भर पडली असून रूग्णांची संख्या ४४६ वर पोहोचलीनिर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दाटवस्ती आणि झोपटपट्यांतही कोरोना शिरला आहे. फिजिकल डिस्टंन्सिंग पालन होत नसल्याने रूपीनगर, खराळवाडी, आनंदनगरनंतर कोरोना भाटनगरमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. दिवसभरात २६ रूग्णांची भर पडली असून रूग्णांची संख्या ४४६ वर पोहोचली आहे.पुण्यात रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या 'हाय रिस्क कॉनट्क्ट' मध्ये आलेल्यांना आठ मार्चला रूग्णालयात दाखल केले होते. त्याचे रिपोर्ट १० मार्चला आले होते. एकाच दिवशी तीन रूग्ण आढळले होते. मार्च आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊनचे पालन कडकपणे होत असल्याने रूग्णांची संख्या नियंत्रित होती. मात्र, २२ मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले आहे. जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा भाग म्हणून दुकाने सुरु करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत आहेत. सुरूवातीला दाट लोकवस्तीत असणारा कोरोना वेगाने वाढत आहे. खराळवाडी झोपडपट्टीनंतर आनंदनगर आणि आता भाटनगर झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या भागालगत असणारी बाजारपेठ बंद केली आहे. बुधवारी शहरात २६ रूग्ण आढळले असून  शहरातील रुग्ण संख्या ४४६ वर पोहचली आहे. २२० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ३५  रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तर  आजपर्यंत १९१ जण कोरोनामुक्त झाले असून पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हौसिंग सोसायटीत आढळणारा कोरोना, मध्यमवर्गीय वसाहतीतून आता झोपडपट्टीत शिरला आहे.२०९ जणांचे अहवाल प्रलंबित महापालिकेच्या रूग्णालयात ८३ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकुण दाखल रूग्णांची संख्या ४६४ झाली आहे. तर आज २६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ६२ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ६६ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील १२ पुरूष, १० महिला आणि पुण्यातील चार पुरूषांचा समावेश आहे. त्यामध्ये चºहोली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळेगुरव, सांगवी, आनंदनगर, चिंचवड, बौद्धनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल, आंबेगाव या भागातील नागरिकांचा समावेश आहे. तर २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात किवळे, रूपीनगर, आनंदनगर, संभाजीनगर, चिंचवड, रहाटणी, चिखली, कसबा पेठ, बोपोडी या भागातील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल