लोणावळा : देशात कोठेही नवीन म्युझियम सुरू करायचे नाही, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाने जारी केल्याने लोणावळ्यात होणारे रेल्वेचे म्युझियम रखडले आहे. पीएमओने मान्यता दिल्यास लोणावळा शहरात निश्चितपणाने रेल्वेचे म्युझिअम होईल, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा बैठकीत दिली.
शहर व परिसरातील समस्या जाणून घेण्याकरिता बारणे यांनी नगर परिषदेमध्ये आढावा बैठक घेतली. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक, शिवसेनेचे तालुका व शहरातील पदाधिकारी, टाटा कंपनी, महावितरण व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात रेल्वेने म्युझिअम सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. जागेची पाहणी व नकाशेदेखील तयार झालेले असताना देशात कोठेही म्युझिअम सुरू न करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने काढल्याने या म्युझिअमच्या कामाला ब्रेक लागला आहे. रेल्वे प्रशासनाने म्युझिअम पूर्वीच मंजूर केलेले असल्याने ते उभारण्याकरिता परवानगी द्यावी, अशी मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. तिला मंजुरी मिळताच म्युझिअमचे काम सुरु होईल, अशी माहिती नगरसेवक बाळासाहेब जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. तुंगार्ली धरणाचे मजबुतीकरण, रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे पुलाची रुंदीकरण याकरिता निधी देण्यासोबत रेल्वेकडून येणाºया अडचणी सोडविण्याकरितापुढाकार घ्यावा अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी बारणे यांच्याकडे केली.उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविणाररेल्वे उड्डाणपुलाचे प्रश्न सोडविण्याकरिता वरिष्ठ अधिकारी व नगर परिषद यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वसन दिले. टाटा कंपनीने बंद केलेले वलवण धरण खुले करण्याची मागणी श्रीधर पुजारी यांनी केली.