पिंपरी: घरगुती किरकोळ कारणांवरून मारहाण करून विवाहितेचा छळ केला. तसेच बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करून तिच्यावर अत्याचार केला. तळेगाव दाभाडे येथे २५ मे ते २२ जून २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाला आहे, असे महिलेला सांगितले. त्यानंतर आळंदी येथे नेऊन त्याने महिलेसोबत लग्न केले. त्यानंतर महिलेचा छळ सुरू केला. स्वयंपाक येत नाही, घरात कचरा असतो, तसेच पगाराचे पैसे देत नाही, अशा घरगुती किरकोळ कारणावरून त्यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्या नको म्हणत असताना आरोपीने बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले.