शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

रिक्षाचालक मालकांचा राज्य सरकार विरोधात संताप; पिंपरीत केले बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:57 AM

राज्य शासनाने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्याांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेे. 

पिंपरी : रिक्षा चालकाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन झाले. रिक्षाचालक मालकांनी केले बोंबाबोंब आंदोलन केले.     

राज्य शासनाने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्याांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेे. एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली.परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंधने घातली आहेत.आज ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात.. तसेच राज्य सरकारने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

बाबा कांबळे म्हणाले, सरकारने एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली.परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंद घालण्यात आली आहेत, आज ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात.'' 

बाळासाहेब भागवत यांनी सांगितले,  रिक्षाचालक हातावरचा पोट असणारा घटक असून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. रिक्षावाल्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत सरकारने त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत.'' 

सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सावळे, कुणाल वावळकर यांनी पाठिंबा दिला. यावेळी बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते, आदी सहभागी झाले होते..........

अशा आहेत मागण्या १) रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे २)शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे ३) मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत ४) रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ५) फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुली साठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत ६) रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी.७)रिक्षा चालक मालकांसाठी कोरोना च्या काळात ५० लाखाचा विमा मिळावा.

 ...........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडauto rickshawऑटो रिक्षाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार