पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरीत जल्लोष

By विश्वास मोरे | Published: October 4, 2023 06:00 PM2023-10-04T18:00:00+5:302023-10-04T18:00:17+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला...

Ajit Pawar as guardian minister of Pune, cheers from NCP workers | पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरीत जल्लोष

पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरीत जल्लोष

googlenewsNext

पिंपरी :पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे? याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी जल्लोष केला. ‘जिल्ह्याचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाºया पिंपरी-चिंचवड शहरात जल्लोष केला. ठिकठिकाणी पेढे वाटण्यात आले तसेच फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विशाल काळभोर, प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सचिन औटे, माजी नगरसेवक अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, सतीश दरेकर, प्रभाकर वाघेरे, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, अक्षय माछरे, सामजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, रवींद्र सोनवणे, अजित पवार, खंडेराव काळे, सचिन मोकाशी उपस्थित होते.

अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री होताच पवार यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरूवात केली असून गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत. तसेच आता पालकमंत्रीपदही पवार यांच्याकडे आल्याने रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याचा बारीक अभ्यास असल्याने तसेच पुढील ५० वर्षांच्या विकासाच्या नियोजनाची दृष्टी  असल्यामुळे शहर व जिल्ह्याच्या विकासात भर पडेल असा विश्वासही अजित गव्हाणे यांनी केला आहे.’’

Web Title: Ajit Pawar as guardian minister of Pune, cheers from NCP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.