'सोशल डिस्टन्सचे तीन तेरा'; वैतागलेल्या अजित पवारांनी मनसेच्या गटनेत्याला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:22 PM2020-08-07T15:22:42+5:302020-08-07T15:43:03+5:30
अजित पवार यांच्या या वक्तव्यावर गटनेते चिखले यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांना एवढीच जर काळजी होती तर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्याशी बोलण्यास जाणाऱ्या मनसेच्या गटनेत्याला पवारांनी चांगलेच सुनावले. आमचे चार मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत. लांबणं बोल, फिजिकल डिस्टन्स ठेव, अशा शब्दांत नगरसेवक सचिन चिखले यांना पवारांनी सांगितले. यावर चिखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील कोवीड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. तर पोलिसही मोठ्या प्रमाणावर होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने पालिकेतील गटनेत्यांनाही बोलावले होते. त्यावेळी काही नगरसेवक फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करीत जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेचे नगरसेवक पवार यांच्या जवळ येऊन बोलत होते. मनसेचे गटनेते सचिन चिखले हे पवार यांच्याशी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करीत असताना अजित पवारांनी त्यांना थांबविले. फिजिकल डिस्टन्स ठेवा, लांबून बोला. आमचे चार मंत्रीही पॉझिटिव्ह आले आहेत, अशा शब्दांत पवारांनी सुनावले.
अजित पवार यांच्या या वक्तव्यावर गटनेते चिखले यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांना एवढीच जर काळजी होती तर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला. ऐकूनच घ्यायचे नव्हते तर बोलावलेले कशाला, अशी नाराजी चिखले यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मी बोलत होतो. मात्र, पवारांनी एकेरी उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप चिखले यांनी केला.
यावर राष्ट्रवादीने स्पष्टीकरणही दिले असून अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला असावा. मास्क लावलेला असल्याने नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. सोशल डिस्टसिंगबाबत त्यांनी दिलेल्या सूचना योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती चिखले यांना केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मागण्या अजित पवारांशी प्रत्यक्ष भेटून ठेवणार आहोत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलं आहे.
आमदार, पदाधिकाऱ्यांची पाठ
पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोवीड केअर सेंटरची पाहणी केली. त्यावेळी महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप हे अनुपस्थित होते. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि उपमहापौर तुषार हिंगे हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Video: केरळच्या प्रसिद्ध मुन्नार टेकडीवर भूस्खलन; 5 मृत; 80 जण ढिगाऱ्याखाली
नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश
नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र
Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??
सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...