पिंपरी: महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांची मनधरणी केल्याने काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर पिंपरी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आठ अपक्षांसह १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांच्यातच मुख्य लढत होणार आहे.
शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यात महायुती, तसेच महाविकास आघाडीकडूनही राष्ट्रवादीसाठी ही जागा देण्यात आली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष, विदुथलाई चिरुथाईगलकाची या पक्षांनीही त्यांचे उमेदवार उतरविले आहेत. शिवाय आठ अपक्ष आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येथे वंचित बहुजन आघाडी आणि बसपचाही मतदार असल्याचे दिसून आले आहे.
यांनी घेतले अर्ज मागे
गौतम चाबुस्कवार, बाबासाहेब कांबळे, रिता सोनावणे, दीपक रोकडे, चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, ॲड. गौतम कुडुक, कृष्णा कुडुक, चंद्रकांत लोंढे, स्वप्निल कांबळे, नवनाथ शिंदे, मनोज कांबळे, काळूराम पवार, जितेंद्र ननावरे, मयूर जाधव, दादाराव कांबळे, मुकुंद ओव्हाळ, जफर चौधरी, सुधीर कांबळे, हेमंत मोरे या अपक्षांनी अर्ज मागे घेतले.
रिंगणातील प्रमुख उमेदवार
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार), अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार)
रिंगणातील इतर उमेदवार
सुंदर कांबळे (बहुजन समाज पार्टी), बाळासाहेब ओव्हाळ (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), मनोज गरबडे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष), राहुल सोनवणे (विदुथलाई चिरुथाईगलकाची), कैलास खुडे, नरसिंग कटके, भिकाराम कांबळे, मीना खिलारे, राजू भालेराव, सचिन सोनवणे, सुधीर जगताप, सुरेश भिसे (सर्व अपक्ष).
एकूण दाखल अर्ज - ३९
बाद अर्ज - ३वैध अर्ज - ३६अर्ज माघार - २१
उमेदवार रिंगणात - १५
मतदारसंख्या
महिला - १८५३५६पुरुष - २०२४७८
तृतीयपंथी - ३४एकूण मतदार - ३८७८६८