अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:25 PM2024-10-02T23:25:34+5:302024-10-02T23:26:05+5:30

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवारांनी घड्याळ हिसकावून घेतले, पण शरद पवारांनी चपळाईने त्यातील सेल काढून घेतले आहेत. त्यामुळे अजितदादांचे घड्याळ चालतच नाही, अशी मिश्किल टिपणी ॲड. असीम सरोदे यांनी आज केली. 

Ajit Pawar's watch cell, Sharad Pawar's hand, Asim Sarode's indicative statement  | अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 

अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 

  पिंपरी - अजित पवारांनी घड्याळ हिसकावून घेतले, पण शरद पवारांनी चपळाईने त्यातील सेल काढून घेतले आहेत. त्यामुळे अजितदादांचे घड्याळ चालतच नाही, अशी मिश्किल टिपणी ॲड. असीम सरोदे यांनी आज केली. 

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने बुधवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ॲड. सरोदे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रम्हे यांनी घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी उपस्थित होते. 
 
 "पक्ष कोणाचा" याचा निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाला हक्क नाही
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे म्हणाले, ''राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या ग्रहण लागले आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णयामुळे गिधाडांच्या सत्तेला निमंत्रण दिले आहे. संविधानाची पायमल्ली होण्याचे असेच प्रकार भारतभर सुरू राहिल्यास देशात फोडाफोडीला ऊत येईल आणि हाहाकार माजेल, सत्तांतराच्या प्रक्रियेत शिवसेनेने निर्णय घेण्यास दिरंगाई केली त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याविषयी सर्वोच्च न्यायालयाला कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. "पक्ष कोणाचा" याचा निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाला हक्क नाही.'' 
 
ॲड. सरोदे म्हणाले, ''आमदार अपात्रता प्रकरणात कोणीच अपात्र नाही, असा निर्णय नार्वेकर यांनी दिला तो हास्यास्पद आहे. त्यांनी निव्वळ वेळ काढूपणा केला, हा अनुभव पाहता यापुढे पक्षांतर होऊच नये यासाठी कठोर कायदे झाले पाहिजेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचा खरा जबाब पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळं आम्ही स्वतंत्र जबाब नोंदवून घेत, सगळी हकीकत न्यायालयात सादर करणार होतो. मात्र त्या आधीच आरोपीचा एन्काऊंटर झाला, तो शंकास्पद आहे.''
 
काळी टोपी घालून काळी कामे
ॲड. सरोदे म्हणाले, ''राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे अपेक्षित असते. मात्र भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना मनमानी कारभार केला. त्यांनी मंत्रिमंडळाचे ऐकलेच नाही. त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीला उद्देशून मी 'फालतू ' शब्द वापरला. तो त्यांच्या लाभार्थ्यांना खटकला. कोश्यारी हे विशिष्ट विचारधारेचे होते. त्यांनी काळी टोपी घालून काळी कामे केली.''
 
३७० चा निर्णय अदानी व अंबानी यांच्या फायद्यासाठी 
''राहुल गांधी आरक्षण विरोधी नाहीत. त्यांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण निर्मिती करण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अमलांत आणण्याची गरज आहे, ३७० हे कलम हाताने अंबानी यांच्या फायद्यासाठीच रद्द करण्यात आले, असे मत ही ॲड. सरोदेंनी व्यक्त केले.  
नाना शिवले यांनी प्रास्ताविक तर नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Ajit Pawar's watch cell, Sharad Pawar's hand, Asim Sarode's indicative statement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.