उद्योग नगरीत अजित पवारांचे जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 25, 2023 11:10 AM2023-08-25T11:10:58+5:302023-08-25T11:11:36+5:30

पिंपरी- चिंचवड शहर हा गेली काही वर्षे अजित पवारांचा यांचा बालेकिल्ला मानला जात होता...

Ajit Pawar's welcome in the industrial city; Enthusiasm among workers | उद्योग नगरीत अजित पवारांचे जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

उद्योग नगरीत अजित पवारांचे जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

googlenewsNext

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पुष्पांची उधळण आणि सोलापूरवरून मागवण्यात आलेला भला मोठा साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

पिंपरी- चिंचवड शहर हा गेली काही वर्षे अजित पवारांचा यांचा बालेकिल्ला मानला जात होता. गेली काही वर्ष इथे भाजपाने जम बसवला आहे, पिंपरी चिंडवड महानगरपालिकाही भाजपाच्याच ताब्यात आहे. आता अजित पवार हे भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणे पुर्णपणे बदलली आहेत. त्यातच या शहरामध्ये देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट बघायला मिळत आहे.

पाच वर्षांचा कालावधी संपल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होणे बाकी आहे. असे असतांना आता या शहरांत अजित पवार काय राजकीय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ajit Pawar's welcome in the industrial city; Enthusiasm among workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.