पिंपरी : पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र पिण्यास पुरेसे पाणी मिळत नाही. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.उपमहापौर शैलजा मोरे यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण लडकत, रवींद्र दुधेकर यांच्यासह अन्य अधिकाºयांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न कसा सुटू शकेल याविषयी अधिकाºयांचे मत जाणून घेतले. पेठ क्रमांक २३ मध्ये पाण्याची उंच टाकी बांधण्याचे नियोजन आहे. टाकीचे हे काम पूर्ण होताच, प्राधिकरण, गंगानगर आणि आकुर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटेल, असे अधिका-यांनी सांगितले.टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी समस्या सुटेल हे कोणीही सांगू शकेल. परंतु सद्य:स्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे करता येईल. याबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांकडून तोडगा सांगितला जात नाही. पाण्याची टाकी बांधण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.निविदा मंजूर होणार, त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्षात टाकी बांधण्याचे काम सुरू होईल, हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे, अर्थातच पाण्याची टाकी उभारण्यापर्यंत दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. एवढी प्रतीक्षा कोण करणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हिवाळ्यात समस्या : उन्हाळ्यात काय होईल ?बैठका बस्स झाल्या, पदाधिकारी, अधिका-यांनी आता कृतिशील पाऊल उचलावे, ऐन हिवाळ्यात पाणी समस्या भेडसावते. उन्हाळ्यात नागरिकांचे काय हाल होतील? याचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. या भागाचा पाणीपुरवठा सुरुळीत करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
आकुर्डी प्राधिकरण : बैठकांनंतरही पाणीप्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 5:59 AM