शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:18 AM

कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे.

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असूनही पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी अनेक धनदांडग्यांच्या मुलांसह सर्वसामान्य नागरिकांची मुले पालकांच्या मर्जीने दुचाकीचा सर्रास वापर करतात. पण वाहतुकीच्या नियमांचे त्यांच्यातील अनेकांकडून उल्लंघन केले जाते.स्पोर्टबाईक व इतर मॉडीफाय वाहनांची तरुणांसह अल्पवयीन मुलांमध्ये क्रेझ असून, आपल्या वाहनावर विविध प्रकारचे स्टंट करणे, भर चौकातून वाहने अतिवेगात चालवण्यात या अल्पवयीन व तरुण चालकांना मोठी मजा येते. त्याचा इतरांना त्रास होतो याचा विचार त ेकरीतच नाहीत.विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कश हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहन व पादचाºयांना कट मारणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात.याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळअपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणाचे वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवताना दिसत आहेत.कामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून जोरात गाडी चालवून पायी चालणाºया नागरिक, महिला व मुलींच्या अंगावर पाणी उडवणे सर्रास होत आहे. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तरगाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे रात्रीच्या वेळी लावून इतरवाहन चालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.अशा बेफाम चालकांवर जरब बसविण्यासाठी नियमितपणेकसून तपासणी आणि दोषींवरकठोर कारवाई करावी. कोणालाही पाठीशी घालू नये अशी मागणीहोत आहे.