कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी दारूची वाहतूक करणारा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. यात दारूच्या बाटल्या फुटून मोठे नुकसान झाले. तर गाडीच्या बॅटरी वर अल्कोहल पडल्याने गाडीने पेट घेतला. यामुळे काहीकाळ पुणे मुंबई लेन वरील वाहतूक खोळंबली.मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी ( दि. १ ) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास चाकण येथून लोणावळ्याकडे दारूचा माल घेवून जाणारा मालवाहतूक पिकअप ( एमएच. १२. केपी. १२९५) वरील चालक बालाजी विठ्ठल निखाते ( वय २९, रा. राहुलनगर, अकोला सध्या रा. चिंबळी, चाकण ) याचे कामशेत खिंडीत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. यात गंभीर दुखापत झाली नाही, मात्र वाहनाच्या बॅटरीवर अल्कोहल सांडल्याने वाहनाने पेट घेतला. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पाणी व मातीच्या सहायाने आग आटोक्यात आणली. अपघात ग्रस्त वाहन व काचेच्या बाटल्यांचा खच बाजूला करीत लेन सुरु करण्यात आली. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र; दारूच्या बाटल्या रस्त्यावर फुटल्याने राडारोडा झाला होता.
कामशेत खिंडीत मद्यविक्री करणारा टेम्पो ; गाडीच्या बॅटरीवर अल्कोहल पडल्याने गाडीने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 8:01 PM
कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी दारूची वाहतूक करणारा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. यात ...
ठळक मुद्देअपघातामुळे काहीकाळ पुणे मुंबई लेन वरील वाहतूक खोळंबली