नेहरुनगर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अमावास्या असल्यामुळे शहरातील ११ निवडणूक कार्यालयात एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने इच्छुकांनी अर्ज भरला नसल्याची जोरदार चर्चा होती. शिवाय राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले असले, तरी उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीबाबतचा निर्णयही अद्याप झालेला नाही. यासह इतर पक्षांकडूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे देखील अर्ज दाखल झाले नाहीत. महापालिकेच्या १२८ जागांसाठी शहरातील ३२ प्रभागांतून मोठ्या प्रमाणावर इच्छुक असतानाही एकही अर्ज दाखल झाला नाही. अनेकजण अर्ज दाखल करताना मुहूर्त पाहतात. अर्ज भरण्यापासून ते प्रचारासाठी घराबाहेर पडण्यापर्यंत मुहूर्त पाहिले जात आहेत. उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. शिवाय अमावस्येचा मुहुर्त त्यामुळे एकही अर्ज दाखल झाला नाही.(वार्ताहर)
उमेदवारी अर्जासाठी अमावास्याचे ग्रहण?
By admin | Published: January 28, 2017 12:27 AM