पिंपरी : सोसायटीच्या आवारातील मातीचे ढिगारे अन् फुटक्या ब्लॉकमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असताना याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत होते. दरम्यान, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राडारोडा तातडीने उचलण्यात आला. पिंपळे गुरवमधील काशीद पार्क येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीमध्ये महानगर गॅस कंपनीने पाइपसाठी खोदकाम केले होते. त्यास महिना उलटल्यानंतरही आवारातील मातीचे ढिगारे व फुटके ब्लॉक तसेच पडून होते. यामुळे अनेकदा नागरिक चालताना अडखळत होते. याबाबत अनेकदा फोन करूनही त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. यामुळे वाहने ठेवायची अडचण होत होती. येथील राडारोडा आता हटविण्यात आला आहे. याबाबत सोसायटीचे सचिव श्रीकृष्ण फिरके म्हणाले की, राडारोडा उचलण्याबाबत वारंवार पाठपुरावा त्याकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘लोकमत’मध्ये रविवार, (दि. २२) वृत्त प्रसिद्ध होताच, लगेचच राडारोडा उचलण्यात आला. (प्रतिनिधी)
...अन् राडारोडा उचलला
By admin | Published: January 25, 2017 1:55 AM