शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

...अन् लाभार्थ्यांच्या चेह-यावर फुलले हास्य! महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी सदनिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:08 AM

केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

पिंपरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुल प्रकल्पातील १२ इमारतींमधील एकूण ५०४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत शुक्रवारी काढली. हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहºयावर हास्य खुलले.महापालिकेतर्फे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य उत्तम केंदळे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, माजी नगरसदस्या ज्योती भारती, सह शहर अभियंता राजन पाटील, सहायक आयुक्त योगेश कडुसकर, उपअभियंता अजय सूर्यवंशी, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, कार्यालय अधीक्षक महेंद्र चौधरी, मुख्य लिपिक ज्योती पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘ लाभार्थ्यांना त्यांच्या कष्टातून मिळणारे हे घर त्यांनी स्वत: वापरावे. सर्वांनी मिळालेल्या घराचा आनंद कायमस्वरूपी घ्यावा. परिसर स्वच्छ ठेवून ओला व सुका कचरा वेगळा करावा. घरकुलमध्ये वातावरण आनंदी व शांततेत राहील, अशी वातावरणनिर्मिती करावी. घरकुलामध्ये मंडई, उद्याने, दवाखाना, सांस्कृतिक हॉल आदींची निर्मिती केली जाईल. उरलेल्या लाभार्थींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ’’माणसाला आयुष्यात स्वत:चे व हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते व त्या दृष्टीने माणूस मार्गक्रमण करीत असतो. मिळालेल्या सदनिकेचा वापर लाभार्थ्यांनी स्वत: राहण्यासाठी करावा. कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत. घरकुलाच्या अटी व शर्तीचे पालन करावे. सोसायटीमध्ये स्वच्छता, शांतता ठेवावी.- नितीन काळजे, महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड