शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

...अन् डेमू आली बारामतीत

By admin | Published: March 30, 2017 12:22 AM

बारामती शहरातील रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. २७) रात्री दाखल झालेल्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) या लोकल

बारामती : बारामती शहरातील रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. २७) रात्री दाखल झालेल्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) या लोकल रेल्वेगाडीचे बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. प्रायोगिक तत्त्वावर ही रेल्वे बारामती येथे आणण्यात आली. प्रत्यक्षात सध्या सुरू असलेल्या बारामती पुणे पॅसेंजर रेल्वे सेवेशिवाय लोकल रेल्वे सेवेसाठी बारामतीकरांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.बारामती रेल्वे स्थानकात प्रथमच आलेली अत्याधुनिक व सुसज्ज असलेली ही रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वेत बसून, रेल्वेजवळ उभे राहून नागरिकांनी मोबाईलद्वारे ‘सेल्फी’ काढण्याचा आनंद लुटला. या वेळी उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी या वेळी स्टेशन मास्तर प्रकाश गोटमारे व या रेल्वेच्या चालकांचा सत्कार करून या सुविधेचे स्वागत केले. तसेच, बारामती विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक सुनील सस्ते, प्रशांत सातव यांनी स्वागत केले. या वेळी झहीर पठाण, संदीप मोहिते, मुनीर तांबोळी आदी उपस्थित होते.सध्या प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातील दोन दिवस ही डेमू लोकल बारामतीमध्ये येणार आहे. मात्र, स्वतंत्र सेवा सुरू होण्यासाठी प्रत्यक्ष जुलै महिन्याची वाट पाहावी लागेल. त्यामुळे पुणे-बारामती लोकल सेवा सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे रेल्वे अधिकारी प्रकाश गोतमारे यांनी सांगितले.