पिंपळे गुरव : दापोडीतील जनहित प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने भोसरीतील लांडगे हॉलमध्ये मुष्ठीयुद्ध स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत अनिकेत शिंदेला संतोष सोनेने यांच्या हस्ते बेस्ट बॉक्सर चा किताब देण्यात आला.या स्पर्धेचे उदघाटन अखिल भारतीय रामोशी समाजाचे अध्यक्ष दीपक माकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दापोडीच्या बॉम्बे चाम्पियनला विजेतेपद देण्यात आले. या वेळी अमर गायकवाड, रवी बालवडकर, सचिन शिंगोटे आदी उपस्थित होते.यश सातव वि तेजस सोनवणे, अनिकेत शिंदे वि शमुवेल गजभिव, जावेद शेख वि वैभव चव्हाण, सौरभ काळभोर वि राजेंद्र जाधव, आदित्य कुलकर्णी वि रमेश फुलसुंदर, स्वराज जाधव वि पंकज गायकवाड, क्षीतिज घाटे वि राजेश कदम, प्रतीक तांबे वि वनेज गायकवाड, प्रणव शहा वि रफिक सय्यद, परेश कांबळे वि रसीट मुल्ला, रफुनाथ प्रसाद वि रहेमान शेख, प्रेमसागर कांबळे वि मंगेश तपस्वी यांच्यामध्ये लढती झाल्या. पंच म्हणून मंगेश मोटे, सदाशिव कांबळे, अमोल चव्हाण, गणेश कदम यांनी काम पाहिले. अनिकेतच्या यशाबद्दल नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(वार्ताहर)
अनिकेत शिंदे ठरला बेस्ट बॉक्सर
By admin | Published: April 25, 2017 4:09 AM