येरवडा : ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ असे अभिमानाने सांगणाºया साहित्यरच्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त येरवडा येथील गुंजन टॉकीजच्या शेजारी व्हॉईट हाऊससमोरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य कलारंगमंदिराच्या प्रांगणात अण्णा भाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर समोरील बाजूस उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा झाली.या सभेत महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थानिक नगरसेवक अॅड. अविनाश साळवे, नगरसेवक कर्णे गुरुजी, महापालिकेतील एमआयएमच्या गटनेत्या आणि स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे, किरण जठार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष रावसाहेब खंडागळे, उपाध्यक्ष सुनील थोरात, सचिव लक्ष्मण सरोदे, स्मारकासाठी केलेल्या संघर्षात सहभागी झालेलेो मिलिंद गायकवाड, सुनील जाधव, श्याम सरोदे, परमेश्वर लोंढे, राजू खुडे, रमेश सकट, सुनील काळोखे, माजी नगरसेवक किशोर विटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अण्णा भाऊंची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:22 AM