पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना शहरात बुधवारी स्वाइन फ्लूच्या तब्बल सहा रुग्णांची भर पडल्याने नागरिकांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. नवीन रुग्ण सापडल्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या एकूण २१९ इतकी झालीआहे. शहरात आजपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी सहा संशयित रुग्णांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ४९ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडणाºयांसह या आजाराची लागण होणाºया रुग्णांची संख्याही वरचेवर वाढत आहे. या वर्षी अवघ्या सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे मृत पावलेल्यांची संख्या २७ वर पोहोचली आहे. केवळ दोन दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे आठ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णांची वाढती संख्या वैद्यकीय विभागाला डोकेदुखी ठरत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अतिगंभीर रुग्णांना देण्यात येणारी टॅमी फ्लूची लसही उपलब्ध नाही. त्यामध्ये रुग्णांची संख्या रोखण्यात महापालिकेला अपयश येताना दिसत आहे. महापालिकेकडून केवळ जनजागृतीवर भर दिला जात आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या आजारात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
स्वाइन फ्लूचे आणखी ६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:49 AM