पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने काळेवाडी, रहाटणी नखातेवस्ती येथील कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. विकास आराखडयातील रस्त्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तेथील स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक केली. तसेच काहींनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे महापालिकेच्या विकास आराखड्यातील बारा मीटर डीपी रस्ता प्रस्तावित आहे. रहाटणीतील नखाते चौक ते कोकणे चौक याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यात तीस वर्षांपासून पंन्नासहून अधिक घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा या रस्त्याला विरोध आहे. त्यांनी हा रस्ता नऊ मीटर करावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. रहाटणी नखातेवस्ती येथील विकास अनधिकृत बांधकाम धारकांना कारवाई करण्याअगोदर नोटीस न देता अतिक्रमण विभागाचे पथक आज सकाळी कारवाईला गेले. नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी करत गोंधळ घातला. जेसीबीवर दगडफेक केली.
रहाटणी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:02 IST
रहाटणी नखातेवस्ती येथील विकास अनधिकृत बांधकाम धारकांना कारवाई करण्याअगोदर नोटीस न देता अतिक्रमण विभागाचे पथक आज सकाळी कारवाई करण्यात आली.
रहाटणी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई पथकावर दगडफेक
ठळक मुद्देरहाटणी येथे महापालिकेच्या विकास आराखड्यातील बारा मीटर डीपी रस्ता प्रस्तावितरहिवाशांचा रस्त्याला विरोध व रस्ता नऊ मीटर करावा, अशी मागणी