शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 9:26 PM

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे.

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी दोन वर्षांसाठी येणा-या सुमारे साडेसात कोटींच्या ऐनवेळसच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. आॅफिसच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने हा विषय ऐनवेळी आणण्यात आल्याचे स्थायी समिती सभेत सांगण्यात आले. नियोजन आणि अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साडेसात कोटी खर्च करण्यात येणार आहेत.महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. यावेळी सिटी ट्रान्फॉरमेशन आॅफीसची निर्मितीचा ऐनवेळसचा प्रस्ताव प्रशासनाने आणला. त्यावेळी विषयपत्रिकेवर विषय का आणला नाही, याबाबत विचारणा केली. त्यावर संबंधित कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करायचे आहे, मंजूरीस विलंब झाला तर उद्घाटनास उशीर होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले. त्यामुळे हा विषय मंजूर केला आहे. दोन वर्षांसाठी नियुक्तीमहापालिकेमार्फत राज्य व केंद्र सरकारच्या अभियानाअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात 'सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस' हे नवीन लेखाशिर्ष निर्माण केले आहे.त्यासाठी 'पॅलाडिअम' सल्लागार संस्थेची दोन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. जेएनएनयुआरएम, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी अभियान, पंतप्रधान अवास योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प कालमर्यादेत व वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामांकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात 'सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस' हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्थसंकल्पात महसुली जमा खर्चात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नवीन लेखाशिर्ष निर्माण केले आहे. डीसीएफ आणि पॅलाडिअम सल्लागार संस्थेची दोन वषार्साठी नियुक्ती केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, संस्था १२० देशामध्ये काम करत असून शहर विकासाचे नियोजन करणार आहे. प्राधान्याने प्रकल्प कोणते हाती घ्यायचे हे निश्चित करेल. महापालिकेला मदत करण्यासाठी या संस्थेची नियुक्ती केली आहे.  स्मार्ट सिटीप्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी फायदा होणार आहे. या संस्थेची दोन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे. त्यांचे काम चांगले असल्यास त्यांना पुन्हा मुदत वाढ देऊ. सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड