शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

आठ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

By admin | Published: May 22, 2017 4:55 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथे केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत उद्यान विकसित करण्यात येणार असून

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथे केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत उद्यान विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी येणाऱ्या सुमारे ८३ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ८ कोटी १६ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या़केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत उद्यान विकसित करण्यासाठी आराखडा महानगरपालिकेने तयार करून तो शासनाकडे पाठविला होता. त्यामध्ये ५० टक्के केंद्र शासनाचा, २५ टक्के राज्य शासनाचा व २५ टक्के महानगरपालिकेचा सहभाग आहे. या उद्याना अंतर्गत लँड स्केपिंग, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान व ४०० झाडांचे वृक्षलागवड या परिसरात करण्यात येणार आहे. यासाठीच्या खर्चास या वेळी मान्यता दिली.महापालिका हद्दीतील एकूण ४१ स्मशानभूमी, दफनभूमीच्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षा ठेवण्यासाठी काळजीवाहक नेमण्यासाठी येणाऱ्या सुमारे ५५ लाख ७० हजारांच्या खर्चास स्थायीच्या बैठकीत मान्यता दिली. ६ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४ कोटी ५८ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. अ क्षेत्रीय कार्यालयातील वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी येणाऱ्या सुमारे ६६ लाख ९८ हजारांच्या खर्चास मान्यता दिली.